कडुलिंबाच्या पाण्यात अंघोळ केल्याने अनेक फायदे होतात.असं म्हंटल जाते. पण खर्च कडुलिंबाचे अनेक फायदे आहेत. म्हणूनच त्याचा वापर अनेक कॉस्मेटिक तयार करण्यासाठी केला जातो.याचे आणखी कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया.
अंगावर खाज सुटत असेल किंवा डोक्यात कोंडा असेल तर अंघोळीच्या पाण्यात कडुलिंब टाकून अंघोळ करावी.
तुम्ही कडुलिंबाची पाने १ लिटर पाण्यात उकळून पाण्यातून काढू शकता. त्या कडुलिंबाच्या पानात थोडे मध घाला. रात्रभर असेच राहू द्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मध आणि कडुलिंबाची पाने मिसळून पेस्ट डोक्याला लावा. ३० मिनिटांनंतर पेस्ट पाण्याने धुवा आणि केसांना सौम्य शॅम्पू लावून धुवा.
कडुलिंबाची पाने कच्च्या हळदीमध्ये मिसळून घेतल्यास त्वचा खूप उजळते.
खोबरेल तेलात कडुलिंबाचे तेल मिसळणे कोंड्याच्या समस्येवर खूप फायदेशीर आहे. खोबरेल तेल किंचित गरम करा. नंतर एक कप खोबरेल तेलात २० कडुलिंबाची पाने टाका. तेल हळूहळू थंड होऊ द्या. त्यात एरंडेल तेल आणि एक चमचा लिंबाचा रस घाला. हे तेल एका डब्यात ठेवा. आठवड्यातून दोनदा लावल्यास कोंड्याच्या समस्येपासून आराम मिळेल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









