थंडीच्या दिवसात बाजारात मोठ्या प्रमाणात गाजर उपलब्ध असते.त्याचसोबत हिवाळ्यात गाजर हे सुपर फूड म्हणून ओळखले जाते.गाजरात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटी ऑक्सिडंट आणि बिटा केरोटीन असते.ज्यामुळे शरीराला योग्य ते पोषण मिळते.आज आपण गाजराचे औषधी गुणधर्म आणि फायदे कोणते आहेत ते जाणून घेणार आहोत.
गाजरात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए, बी, सी, डी आणि ई असल्यामुळे ते तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठीदेखील उत्तम ठरते. नियमित गाजराचा रस पिण्याने तुमची नजर उत्तम राहते. म्हणूच उत्तम दृष्टीसाठी गाजराचा आहारात समावेश करावा.
गाजर हे कँसर सारख्या मोठ्या आजारावर देखील उपय्क्त ठरते. गाजरातील बीटा केरोटीन आणि कॅरोटेनॉईडमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि कॅन्सरच्या पेशींना प्रतिबंध करते.
ताज्या आणि कच्च्या गाजरामुळे तुमचे दात मजबूत राहतात, तसेच तोंडातील दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.
नियमित गाजर खाण्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि शरीराला अँटी ऑक्सिडंचा पुरवठा होतो. यामुळे ह्रदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी गाजर खायला हवे.
गाजरामधील अँटी ऑक्सिडंट घटकामुळे शरीरातील रक्त शूद्ध होते. आणि यामुळे त्वचेच्या समस्या किंवा विकारांपासून सुटका मिळवण्यासाठी गाजर फायदेशीर ठरते. तसेच त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन त्वचा मुलायम बनते.
गाजरात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई असते,यामुळे केसांच्या वाढीस मदत मिळते, त्याचबरोबर गाजर आणि गाजराचा रस केसगळतीच्या समस्यांसाठी उत्तम औषध आहे कारण ते केसांची मुळे मजबूत करण्यास मदत करतात.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









