आजकाल बऱ्याच स्त्रियांना केसांच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.त्यामध्ये केस दुभंगणे किंवा केसांना फाटे फुटणे ही समस्या तर अनेक महिलांमध्ये आढळून येते.यामुळे केसांची वाढही खुंटते. पण या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. आज आपण दुभंगलेल्या केसांची समस्या दूर करण्यासाठी काही उपाय जाणून घेऊयात.
केसांवर सतत वेगवेगळ्या क्रीम्सचा वापर करणे, किंवा गरम पाण्याने सतत केस धुतल्यामुळे केस दुभंगण्याची समस्या निर्माण होते. जर तुम्ही खारट पाण्याने केस धूत असाल किंवा स्विमिंग करत असाल तरीदेखील केसांच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.अशा दुभंगलेल्या केसांपासून सुटका करून घेण्यापासून काही घरगुती उपाय करू शकता. त्यासाठी दही आणि मध एकत्र करून लावल्यानेही ही समस्या दूर होते. एक कप दह्यामध्ये दोन चमचे मध नीट मिक्स करून केसांवर लावा. मधामुळे केसांवर चमक येईल आणि दुभंगलेल्या केसांपासून सुटका होईल. याचबरोबर एरंडेल तेल आणि मोहरीचे तेल समान प्रमाणामध्ये एकत्र करा. त्यानंतर केसांना या तेलाने मालिश करा. त्यामुळे तुम्हाला फायदा होईल. घरात वापरलं जाणारं बदामाचं आणि नारळाचं तेलही यांवर चांगला उपाय आहे. ऑलिव्ह ऑईल थोडं गरम करून लावल्यानं केस मुलायम होतील आणि दुभंगलेले केस कमी होतील.
वरील माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून कोणताही उपाय करण्याआधी सौन्दर्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.









