नवी दिल्ली :
पुण्यातील ऑटो क्षेत्रातील कंपनी बजाज ऑटो लिमिटेडचा सध्या प्रवास धिमा झाल्याचे समजते. पुरवठा साखळी विस्कळीत असल्याने त्याचा परिणाम उत्पादन प्रक्रियेवर होत आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा यांनी ही माहिती दिली. कंपनीच्या विक्रेत्यांचे जाळे 3 महिन्यात 40 वरून 88 शहरांपर्यंत पसरले आहे. वर्षअखेरपर्यंत चेतक स्टोअर्सची संख्या वाढवली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.









