वृत्तसंस्था/ हैद्राबाद
रंग उत्पादक कंपनी टेक्नो पेंट्स आगामी काळामध्ये तीन नवे प्रकल्प सुरु करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या तीन प्रकल्पांसाठी 46 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
टेक्नो पेंट्स कंपनी आपले तीन नवे प्रकल्प आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम आणि चित्तूर तसेच मध्यप्रदेशमधील कटणी येथे सुरु करणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक निर्मिती कारखान्यातून 30 हजार मेट्रीक टन इतके वार्षिक उत्पादन घेतले जाणार आहे. सदरच्या प्रकल्पांसाठी लागणारी रक्कम ही कर्जाच्या माध्यमात उभारली जाणार आहे, अशी माहिती टेक्नो पेंट्सची मालकी असणाऱ्या फॉर्च्यून समूहाचे संस्थापक अकुरी श्रीनिवास रे•ाr यांनी दिली आहे.
भारतामध्ये रंग उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये कंपनीला आगामी काळामध्ये आघाडी घ्यायची आहे. त्या दृष्टीनेच कंपनीने नव्या प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित केले आहे.









