वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढच्या कॅलेंडर वर्षात आयटी क्षेत्रात नोकर भरतीमध्ये 8.5 टक्के इतकी वाढ होणार असल्याचा अंदाज इंडीडफौऊंड या प्लॅटफॉमने वर्तविला आहे.
मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये पुढील वर्षी 8.5 टक्के इतकी आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये भरती वाढीव दिसून येणार आहे. सध्याला आयटी क्षेत्रातील रोजगार आहे त्यामध्ये 70 टक्के उमेदवार हे सॉफ्टवेअरशी संबंधीत आहेत. यामध्ये डेव्हलपर म्हणून भरती होण्याचे प्रमाण 7.29 टक्के, सॉफ्टवेअर इंजिनिअर 5.54 टक्के, फुलस्टॅक डेव्हलपर 4.34 टक्के, सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर 4.22 टक्के आणि पीएचपी डेव्हलपर 2.51 टक्के राहिले आहे. विविध उत्पादनांच्या निर्मिती, विकासासाठी डेव्हलपर्सची भरती होत आहे. नव्या सॉफ्टवेअरशी संबंधीत वैशिष्ट्यांची भर घालणाऱ्या तज्ञांची मागणी असेल.









