पृथ्वीवर पोहोचणार नाहीत सूर्यकिरणे
पृथ्वीची कनिष्ट कक्षा म्हणजेच लोअर अथ ऑर्बिट काही दिवसांमध्ये जाम होईल, सूर्यकिरणे देखील फिल्टर होऊन येतील, कदाचित पृथ्वीवर पोहोचणार देखील नाहीत. आणखी कुठले रॉकेट या ऑर्बिटला पार देखील करू शकणार नाही. 100-1000 किलोमीटरपर्यंतच्या उंचीवर ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे.
या पूर्ण झोनमध्ये सध्या 14 हजारांहून अधिक उपग्रह आहेत, यातील 3.5 हजार उपग्रह निकामी ठरले आहेत, याचबरोबर मोठ्या प्रमाणात अंतराळ कचरा फिरत आहे, स्पेस ट्रॅफिक कॉर्डिनेशनवरून स्थापन संयुक्त राष्ट्रसंघाच्या समितीने आता देश, कंपन्या आणि कॉर्पोरेट्सना उपग्रह प्रक्षेपणावरून विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. उपग्रह प्रक्षेपण मर्यादित केले जावे, अंतराळातून कचरा साफ केला जावा असे या समितीचे म्हणणे आहे.
अंतराळात अत्यंत अधिक संख्येत उपग्रह झाल्याने त्यांचे टॅफिक मॅनेज करणे अवघड ठरणार आहे. युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर आउटर स्पेस अफेयर्सच्या संचालिक आरती होला-मॅनी यांनी पृथ्वीच्या चहुबाजूला फिरत असलेला अंतराळ कचरा आणि उपग्रहांना साफ करावे लागेल, अन्यथा भविष्यात त्यांची टक्कर होईल असे म्हणत सतर्क केले आहे.
पृथ्वीवर कोसळणार उपग्रह
हे उपग्रह पृथ्वीवर कोसळतील, अंतराळ मोहिमेला या बेल्टला पार करावे लागेल, ज्यात अंतराळयान आणि मानवी मोहिमेला धोका निर्माण होऊ शकतो. जगातील सर्व सक्षम देश, कंपन्या आणि कॉर्पोरेट्सना उपग्रहांची संख्या मर्यादित करण्याविषयी विचार करावा लागेल. यामुळे समस्या कमी होईल अन्यथा मोठे संकट ओढवणार असे आरती यांनी म्हटले आहे.
वेगवेगळे उपग्रह प्रक्षेपित करणे टाळा
एकाच कामासाठी वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे उपग्रह प्रक्षेपित करण्याऐवजी मिळून एकच उपग्रह प्रक्षेपित करणे हा यावरील सोपा उपाय आहे. परंतु याप्रकरणी चीन आणि रशिया हे देश अडथळा ठरले आहेत. ऑगस्ट महिन्यात चीनच्या रॉकेटचा हिस्सा याच ऑर्बिटमध्ये नष्ट झाला होता, यामुळे हजारोंच्या संख्येत त्याचे अवशेष अंतराळात विखुरले गेले. तर जून महिन्यात रशियाचा निकामी उपग्रह नष्ट झाला होता, यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळवीरांना धोका निर्माण झाला होता, त्यांना एक तासापर्यंत रेस्क्यू मॉड्यूलमध्ये जावे लागले होते. पृथ्वीच्या कनिष्ठ कक्षेत मोठ्या संख्येत उपग्रह आहेत, अधिक संख्येत उपग्रह प्रक्षेपित केले जात असल्याने अंतराळात टक्कर होण्याची भीती बळावत चालली आहे.









