ऑनलाईन टीम / तरुण भारत :
येत्या 15 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठे स्फोट होतील, नेमके काय होईल, हे 15 दिवस थांबा मग कळेल, असा गौप्यस्फोट वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात केला आहे.
एका पुस्तकाच्या प्रकाशासाठी प्रकाश आंबेडकर पुण्यात आले होते. त्यावेळी माध्यमांनी महाराष्ट्रातील राजकारणावर त्यांना प्रयत्न विचारला. त्यावेळी देशात आणि राज्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, येत्या पंधरा दिवसात दोन मोठे राजकीय स्फोट होतील. काय होईल ते मी आत्ताच सांगणार नाही. मात्र, पंधरा दिवसानंतर आपण भेटू, त्यावेळी त्याचे उत्तर तुम्हाला मिळेल, असे आंबेडकर यावेळी म्हणाले.








