ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यात आणीबाणीपेक्षा वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाहीचे मुखवटे घालून देशात दहशत निर्माण केली जात आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर दबाब आणला जात आहे. मलाही तुरूंगात मारण्याचा प्रयत्न झाला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
संजय राऊत रत्नागिरीत मीडियाशी बोलत होते. ते म्हणाले, रत्नागिरीतील पत्रकार वारिसेंच्या हत्येमागे राजकीय षडयंत्र आहे. लोकांची बाजू मांडणाऱ्या पत्रकाराला मारणे ही गंभीर बाब आहे. एकाच वेळी आजबाजूचे तिन्ही सीसीटिव्ही बंद कसे होते? पूर्वी अशा घटना बिहारमध्ये होत होत्या. आता महाराष्ट्राचा बिहार झाला की काय? असा सवाल उपस्थित करत वारिसेंच्या हत्येमुळे सरकारची बेअब्रू झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अधिक वाचा : प्रकृती खालावली असतानाही खा. बापट प्रचाराच्या रिंगणात
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर दबाब आणला जात आहे. मलाही तुरूंगात मारण्याचा प्रयत्न झाला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट करत राऊत यांनी सरकारने वारिसेंच्या कुटुंबाचा आक्रोश ऐकला पाहिजे. तसेच त्यांच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत करावी अशी मागणीही यावेळी केली.








