नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेस पक्षाचे यु-टय़ूब चॅनल डीलीट केल्याने खळबळ उडाली आहे. यासंबंधीची माहिती पक्षानेच सोशल मीडियावर दिली आहे. आमचे यु-टय़ूब चॅनल इंडियन नॅशनल काँग्रेस डिलीट करण्यात आल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. आम्ही ते पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करत असून गुगल आणि यु-टय़ूब हेल्पलाईन टीमशी आमची चर्चा सुरू असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. हा प्रकार नेमका कसा घडला याचा आयटी तज्ञांकडून तपास सुरू आहे. पक्षाने चॅनल पुन्हा सुरू करण्याची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे.









