मणेराजूरी / वार्ताहर
करोली (एम) ते योगेवाडी या रस्त्यावर सोमवारी दुपारी हॉटेलपासून थोडया अंतरावर मणेराजूरी हद्दीत एक पुरुष जातीचे नुकतेच जन्मलेले मृत अर्भक आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेची तासगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे.
याबाबतची माहिती अशी की, सोमवारी दुपारी अडीचच्या दरम्यान करोलीएम फाटी ते योगेवाडी या रस्त्यावर एका हॉटेलच्या थोड्या अंतरावर एका टॉयलेटच्या बाजूस एक पुरुष जातीचे मृतअज्ञात अर्भक आढळले ; येथील एका इमारतीचे बांधकाम चालू होते या बांधकामावरील कामगाराने हे अर्भक पाहिले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली येथील राहणाऱ्या ग्रामस्थांनी सदरची घटना पोलीस पाटील दीपक तेली यांना सांगितली पोलीस पाटील तेली यांनी ताबडतोब तासगाव पोलीस स्टेशनला या घटनेची कल्पना दिली. अनैतिक संबंधातून कोणी फेकून दिले आहे का? आणि कोणते कारण आहे ! कोणी हे फेकून दिले दिले आहे ! याबाबत पोलीसांकडून चौकशी सुरु आहे. पंचनामा करून अर्भकास पोलीसांनी शवविच्छेदनास पाठवले असून या घटनेची तासगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे.








