मानसिक आजारांवर व्हायचे उपचार
सध्या वैद्यकीय जगताचा भर मानसिक आरोग्यावर अधिक आहे. बदलती जीवनशैली आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे अनेकदा लोक मानसिक तणावाला बळी पडतात. अशा स्थितीत औषधे आणि इतर उपचारपद्धतींनी मानसिक समस्येने ग्रस्त लोकांना दिलासा मिळवून दिला आहे. परंतु मानसिक तणावापासून मुक्तता मिळविण्याची ही प्रक्रिया नवी नाही. हजारो वर्षांपासून अशाप्रकारच्या समस्यांपासून दिलासा मिळवून देण्याचे मार्ग अवलंबिले जात होते.

प्राचीन काळात जेव्हा वैद्यकीय चिकित्सा पद्धत विकसित झाली नव्हती, तेव्हा छोट्या छोट्या उपायांद्वारे आजार बरे केले जायचे. मनोचिकित्सेला याचमुळे चिकित्सेची सर्वात जुनी शाखा संबोधिले जाते. प्राचीन युनानी मंदिरांमध्ये प्रचलित उपचार अन् बहुचर्चित ऑस्ट्रेलियन मनोचिकित्सक फ्रायड यांच्या लिखाणात अशा पद्धतींचे पुरावे मिळतात.
4 हजार वर्षांपासून इजिप्तच्या लोकांनी स्लीप टेम्पल्सची निर्मिती केली होती. पूजा-अर्चनेसोबत हे मानसिक-शारीरिक समस्येपासून दिलासा मिळवून देणारे शरणस्थळ ठरले होते. तत्कालीन पुजारीवर्ग लोकांना अर्धचेतनेच्या अवस्थेत नेऊन त्यांच्या स्वप्नांची व्याख्या करायचे. तसेच जीवन सुधारण्यासंबंधी सल्ला देत होते. चिंतेत तसेच दु:खी लोकांना संगीत, चित्रकला आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचे सल्ले दिले जात होते.









