प्योंगयांग
किम जोंग उन यांना किरणोत्सर्गी विषाद्वारे मारण्याचा कट रचण्यात आला होता असा दावा उत्तर कोरियाने केला आहे. उत्तर कोरियाने या प्रकरणी अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या एजंट्सवर आरोप केला आहे. 2017 मध्ये किम जोंग उन यांची सत्ता उलथवून टाकण्याचा कट होता. उत्तर कोरियन शरणार्थीसाठीच्या आयोगाचे सीईओ दोह ही-यून हे हा कट यशस्वी करू पाहत होते. दोह यांना सायबेरियन शहर खाबरोवस्कमध्ये किम सियोंग इल यांची भेट घ्यायची होती. कट रचणऱ्यांनी सत्तापालटाची बाब फैलावण्यासाठी युएसबी स्टिक आणि मेमरी कार्डचे वितरण करण्याची योजना आखली होती. ज्यात किम यांना सत्तेवरून हटवत त्यांची हत्या करण्यात येणार असल्याचे म्हटले गेले होते असा दावा उत्तर कोरियाने केला आहे.









