कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे समस्या
बेळगाव : बसवण कुडची येथील केएचबी कॉलनीला गेल्या 9 दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे या परिसरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. नगरसेवकाचा भाऊच एल अॅण्ड टी कंपनीकडे कामाला आहे. मात्र फोन केले असता फोन देखील उचलत नसल्याच्या तक्रारी या परिसरातील नागरिकांनी केल्या आहेत. पाणी सोडण्यामध्ये नेहमीच मुतकेकर हा कर्मचारी दुर्लक्षपणा करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. बसवण कुडची येथील केएचबी कॉलनी, डीए कॉलनी यासह इतर परिसरात पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या परिसरातील जनता आंदोलनाच्या तयारीत असून तातडीने एल अॅण्ड टी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचबराब्sार महापालिकेनेही लक्ष द्यावे आणि ही समस्या दूर करावी, अशी मागणी करण्यात आली.









