कित्येक वर्षांपासूनच्या परंपरेचे लोकांकडून पालन
अमेठीतील ऐंठा गावात सुमारे 200 कुटुंबांचे वास्तव्य आहे. या गावात रस्ते, वीज, पाणी या सर्व सुविधा आहेत, कित्येक घरांमध्ये फ्रीज, कुलर आणि वॉशिंग मशीन देखील दिसून येईल, परंतु कुठल्याच घरात टीव्ही दिसणार नाही. गावात टीव्हीचा वापर न करण्याची परंपरा आहे. कित्येक वर्षांपासूनची ही परंपरा ग्रामस्थ आजही पाळत आहेत. टीव्ही नसल्याने या गावातील लोकांना परस्परांसोबत अधिक वेळ देता येतो.

अमेठीच्या गौरीगंज तालुक्यातील ऐंठा गावात सुमारे 200 घरे आहेत, यातील कुठल्याच घरात टीव्ही दिसून येणार आहे. मुलांच्या शिक्षणासाठी गावात 2 शासकीय शाळा आहेत, तसेच एक मदरसा देखील आहे, येथे मुलांना उर्दूसोबत हिंदी भाषा शिकविली जाते. गावात जवळपास सर्व सुविधा आहेत. परंतु येथे टीव्हीचा लोक आजही वापर करत नाहीत. एवढेच नव्हे तर विवाहसोहळय़ांमध्ये कुणालाच भेटवस्तू म्हणून टीव्ही दिला जात नाही तसेच स्वीकारला जात नाही. या गावातील लोक विदेशातही पोहोचले आहेत, तेथेही ते टीव्हीचा वापर टाळतात.
परंपरा कायम राखणार
गावात टीव्ही पाहण्याची परंपरा नाही. गावातील कुठल्याच घरात टीव्ही नाही. ही परंपरा जुनी असून भविष्यातही त्याचे पालन करणार असल्याचे एका ग्रामस्थाने म्हटले आहे. टीव्हीमुळे मुलांना दुष्प्रभाव पडू नये म्हणून त्याचा वापर रोखण्यात आला आहे. जर कुणी मोबाइलवर लपून छपून टीव्हीचे कार्यक्रम बघत असावा, परंतु घरात टीव्ही पाहण्यास गावात मनाई असल्याचे सरपंच मोहम्मद शमीम यांनी सांगितले आहे.









