माणसाच्या आयुष्याचे काही खरे नसते, असे म्हटले जाते. त्याचेच काहीसे प्रत्यंतर अमेरिकेतील ओहायो या शहरातील एका महिलेला आले आहे. ही महिला नेहमीप्रमाणे जिममध्ये जाऊन व्यायाम करत होती. मात्र, अनपेक्षितपणे एक घटना अशी घडली, की महिलेचे प्राण धोक्यात आले. इनर्व्हजन टेबलावर ही महिला व्यायाम करत होती. हे यंत्र व्यायाम करणाऱयाच्या पुऱया शरीराला उलटे करून पाठीच्या कण्याला ताण देते. यामुळे पाठदुखीपासून आराम मिळतो. ही महिला या व्यायामाचे प्रात्यक्षिक करत असताना स्वतःचाच व्हिडिओही काढत होती. अचानक हे यंत्र लॉक झाल्याने महिला आतच अडकली. सहसा असे होत नाही. कारण हे यंत्र बनविताना सुरक्षिततेची पूर्ण दक्षता घेतलेली असते. कुठलाही दोष निर्माण झाल्यास यंत्र त्वरित बंद पडते. पण लॉक होत नाही. तरीही या महिलेवर असा प्रसंग उद्भवला. त्वरित तिच्या स्मार्ट वॉचचा उपयोग करून पोलिसांना बोलाविण्यात आले आणि महिलेला तातडीची सेवा पुरविण्यात आली. त्यामुळे ती जिवंत या मशीनमधून बाहेर येऊ शकली. आपण अक्षरशः आपला मृत्यू पाहिला, असे तिने नंतर सहकाऱयांशी बोलताना सांगितले. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ मोठय़ा प्रमाणात पाहिला जात आहे.
Previous Articleशेअर बाजारात सेन्सेक्स वधारासह बंद
Next Article मँचेस्टर युनायटेडकडून अर्सनेलचे आव्हान समाप्त
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









