साक्षी हत्या प्रकरण : अल्पवयीन मुलीच्या हत्येचा कुठलाच पश्चाताप नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत 16 वर्षीय मुलीची हत्या करणाऱ्या साहिलला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर सोमवारी अटक केल्यावर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आहे. साहिलला या हत्येचा कुठलाच पश्चाताप होत नसल्याचे समोर आले आहे. हत्येच्या 15 दिवसांपूर्वीच चाकू खरेदी केला होता असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.
साक्षीने अचानक ब्रेकअप केल्याने संतापलो होतो. याचमुळे पूर्ण प्लॅनिंग करून तिची हत्या केल्याचे साहिलने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले आहे. हत्येनंतर साहिल रिठाला येथे गेला होता, तेथे चाकू लपवून ठेवत तो बुलंदशहर येथे पोहोचला होता. पोलिसांना अद्याप हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू सापडलेला नाही.
बुलंदशहर येथे जाण्यासाठी साहिलने 2 बसेस बदलत्या होत्या. तसेच हत्येनंतर स्वत:चा मोबाइल स्विचऑफ केला होता. त्याचा मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. हत्येवेळी त्याच्याकडे मोबाइल नव्हता. ही हत्या त्रिकोणी प्रेमातून घडल्याचे बोलले जात आहे. साक्षीने स्वत:च्या हातावर अन्य एका मुलाचे नाव कोरून घेतले होते. यातून साक्षी अन् साहिल यांच्यात भांडण झाले होते असे सांगण्यात येत आहे.
साहिलने रविवारी संध्याकाळी 16 वर्षीय साक्षीची हत्या केली होती. साक्षीवर तिने चाकूने 16 वार केले होते असे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. तसेच साहिलने तिला दगडाने ठेचले होते. साहिल स्वत:च्या कुटुंबासोबत राहत होता. तसेच तो फ्रीज अन् एसी दुरुस्तीचे काम करायचा.