अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकारने मद्याचे दर वाढविलेले नाहीत. यासंबंधीचा कोणताही अधिकृत आदेश जारी करण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी दिला. शुक्रवारी बेंगळूरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.
गॅरंटी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार अबकारी महसूलात वाढ करण्यासाठी मद्याचे दर वाढविणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे मद्यप्रेमींमध्ये नाराजी होती. याविषयी अबकारी मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सरकारपुढे मद्याचे दर वाढविण्यासंबंधीचा कोणताही प्रस्ताव नाही. अबकारी खात्याकडून मद्याचे दर वाढविण्यात आले नसल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. याविषयी पुन्हा पडताळणी करून कळविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.









