पानिपतच्या मराठा शौर्य दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्वाचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / पानिपत
हरियाणातील पानिपत येथे 264 वा मराठा शौर्य दिन पाळण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित होते. पानिपतात मराठ्यांचा पराभव झालेला नव्हता. मात्र त्यांचा या अभियानात पराभव झाला होता. आपण एकत्र राहिलो नाही, तर सुरक्षित राहू शकत नाही, हा संदेश पानिपताच्या संग्रामाने आपल्याला दिला आहे. ‘एक नही, इसलिये सेफ नाही’ हाच पानिपतने आपल्याला शिकविलेला धडा आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
1761 च्या पानिपतच्या तिसऱ्या संग्रामात सदाशिवराव पेशवे यांच्या नेतृत्वातील सेनेला अहमदशहा अब्दाल्लीच्या सेनेसमोर माघार घ्यावी लागली होती. त्या संग्रामात मराठा सैन्याने अत्यंत जटील परिस्थितही अतुलनीय पराक्रमाचे दर्शन घडविले होते. अहमदशहा अब्दाल्लीचा वरकरणी विजय झाला असला तरी त्या युद्धानंतर त्याने पुन्हा भारतावर हल्ला करण्याचे धाडस दाखवले नव्हते. तसेच त्या युद्धानंतरही दिल्लीवरचे मराठ्यांचे वर्चस्व कमी झाले नव्हते. त्यामुळे तो पराभव नसून माघार होती, असे अनेक मत अनेक इतिहासकारांनी व्यक्त केले आहे.
पानिपत आजही स्मरणीय
पानिपतच्या संग्रामाने महाराष्ट्राला अनेक धडे दिले आहेत. आपल्या देशाला कमजोर करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या कुशक्तींच्या विरोधात आपण एकात्मतेचे दर्शन घडविले पाहिजे. आपण एकत्र राहिलो नाही, तर राष्ट्रविरोधी शक्तींकडून संपवेले जाणार आहोत. मात्र, एकत्रित संघर्ष केल्यास शत्रू कितीही बलवान असला तरी त्याची डाळ शिजणार नाही, असे प्रतिपादन फहणवीस यांनी केले.
मराठा शौर्याचे प्रतिक
पानिपतचे तिसरे युद्ध हे मराठ्यांच्या पराक्रमाचे प्रतीन मानले जाते. येथे 264 वर्षांपूर्वी बलिदान केलेल्या हिंदू वीरांचे स्मरण या संग्रामदिनानिमित्त केले जाते. यावेळचा हा 264 वा स्मरणदिन होता. हे युद्ध मराठा सेनेला एकाकी करावे लागले होते. त्यावेळी उत्तर भारतातील अन्य राजांचे साहाय्य मराठ्यांना झाले असते, तर हिंदूंचा विजय निश्चित होता. तथापि, तसे झाले नाही. त्यामुळे माघार घ्यावी लागली. परिणामी, एक है तो सेफ है हेच तत्व योग्य असून त्याचे पालन आपण सर्व राष्ट्रनिष्ठांनी करावयास हवे, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली.









