राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी दुर्दैव; कुटुंबियांना मदतीसाठी राज्य शासनाला पाठवला- जिल्हाधिकारी रेखावार
कोल्हापूर प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात डॉक्टरचा शोध घेताना कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या जवानाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम बीड जिल्ह्यात गेल्या वरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबत स्पष्टिकरण दिले आहे.
आपल्या प्रसिद्धीपत्रकात जिल्हाधिकऱ्यांनी जवान राजकुमार मोरे यांचा मृत्यु जिल्ह्याला बसलेला एक धक्का असल्याचं म्हटल आहे, ते म्हणाले “राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्षमपणे काम करतो. त्यामध्ये कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनाचाही समावेश आहे. त्यामुळे अशा प्रकारछी एखादी आपत्ती ओढावल्यानंतर इतर जिल्ह्यातून कोल्हापूरात मदत मागितली जाते.” कोल्हापूर जिल्ह्यातून आपत्ती व्यवस्थापनाची टीम बीडला पाठवण्याबाबत कोणती अनियमितता झाली नाही. बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या संवादानंतर ही टीम तिकडे पाठवल्याचं जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी म्हटले आहे. जवान राजशेखर मोरे यांचा मृत्यू कोल्हापूर जिल्ह्यात नाही तर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी दुर्दैव आहे. त्यामुळे त्याचा सविस्तर अहवाल राज्य शासनाला पाठवला असून लवकरच त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळेल असा देखील राहुल रेखावार यांनी आश्वासित केलं आहे.









