प्रतिनिधी/ पणजी
राज्यात रविवारी सर्वत्र पावसाने हजेरी लावली. सायंकाळी संपूर्ण गोवाभर पर्जन्यवृष्टी झाली. त्यानंतर मध्यरात्री पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने आज मंगळवारी देखील राज्यात सर्वत्र मध्यम तथा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
सोमवारी सत्तरी, डिचोली, सांगे, काणकोण आदी भागात ढगाळ वातावरण होते मात्र पणजीत व किनारपट्टीच्या भागात सर्वत्र सूर्यकिरणे पडली होती. वाऱयाचा वेग बराच वाढला होता. हवामान खात्याने सोमवारी विजांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा दिला होता. आजही गडगडाटासह पाऊस पडेल असे म्हटले आहे. त्यासाठी एलो अलर्टही जारी केला आहे. जोरदार वाऱयांमुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशाराही हवामान खात्याने गुरुवार दि. 14 डिसेंबरपर्यंत दिला आहे.









