बेळगाव : गणेशेत्सवाला बुधवार दि. 27 पासून सुऊवात होत असून शहर परिसरात चैतन्य व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सकाळच्या सत्रात घरोघरी श्रीमूर्ती दाखल होतील. सायंकाळनंतर सार्वजनिक गणेशेत्सव मंडळांच्या श्रीमूर्ती मंडपात दाखल होतील. यंदा बहुतांशी मंडळांनी भव्य श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निश्चय केल्याचे दिसून येते. काही मंडळांचे श्रीमूर्ती आगमन सोहळे पाच-सहा दिवसांपासून सुरू आहेत.
गणेशोत्सव घरी असो वा सार्वजनिक स्थळांवर सजावट, विद्युत रोषणाई करण्यात भक्त केणतीही कसर राहू देत नाहीत. प्रत्येकजण आपल्या कुवतीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करीत असतो. उत्सवात आणखी एक मुख्य घटक म्हणजे पुरोहित अर्थात भटजी. भटजींच्या हस्ते श्रीमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. गणेशोत्सवात चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत भटजींना सार्वजनिक स्थळांवर व घरांतूनही मागणी असते.
श्रींची प्राणप्रतिष्ठा, श्री सत्यनारायण पूजा, गणहोम, मंत्रपुष्प, उत्तरपूजा यासारख्या धार्मिक विधींसाठी पुरोहितांची गरज भासते. त्यामुळे शहर आणि उपनगरांतील भटजींना सध्या मोठी मागणी आहे. शहरात 50 ते 60 भटजी असून त्यांच्याकडे साहाय्यक म्हणूनही काही भटजी आहेत. उत्सवाच्या निमित्ताने घरगुती स्वऊपात किंवा मंडऴांकडून मागील 15 दिवसांपूर्वी बुकिंग झाल्याचे दिसून येते. एखाद्या धार्मिक विधीसाठी अमूकच दक्षिणा नसते. त्यांच्या कुवतीनुसार भटजी दक्षिणा स्वीकारत असतात.
अनेक भटजींना चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंतचे पॅकेज सार्वजनिक मंडऴांकडून मिळत असते. उत्सव काळातील 10 ते 11 दिवसांची दक्षिणा चार हजार ऊ. पासून पुढे सुरू हेते. प्रत्येक मंडळ आपल्या ऐपतीनुसार भटजींना दक्षिणा देत असते. घरांमधून प्राणप्रतिष्ठेसाठी 500 ऊ. पासून पुढे. श्री सत्यनारायण पूजा, मंत्रपुष्प, श्रींची उत्तरपूजा या विधींनाही एवढीच दक्षिणा मिळते. अनेक गणेश मंडळे गणहोमचे आयोजन करीत असतात. या धार्मिक विधीचे स्वऊप पाहून दक्षिणा ठरते. गणहोमसाठी लागणारे साहित्य मंडळ देणार असल्यास 5 हजारपासून दक्षिणा सुरू हेते. भटजींनी साहित्य आणावयाचे झाल्यास साहित्याचा खर्च व दक्षिणा मंडळांना द्यावी लागते.









