जिह्यातील 96 पोलिसांना पदोन्नती
कोल्हापूर
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिह्यातील 96 पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती जाहीर केली. पदोन्नती मिळाल्यामुळे जिल्हा पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण आहे. पदोन्नती मिळालेल्यांनी साखर, पेढे वाटून हा आनंद साजरा केला.
पोलीस दलात सेवा बजावत असताना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळते. जिह्यातील 45 सहाय्यक फौजदारांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती, तर 24 पोलीस हवालदारांना फौजदारपदी, 27 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदारपदी पदोन्नती मिळाली आहे. पदोन्नतीचा आदेश शनिवारी (25 जानेवारी) पारित केला आहे.
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळालेल्यांमध्ये दिनकर पाटील, राजाराम पाटील, आप्पासाहेब सातवेकर, पांडूरंग पाटील, शशिकांत मेतके, सुहास शिंदे, बाबुराव घोरपडे, दादामियाँ कापसे, इम्तिहाज कोठीवाले, बबन माळी, राजेंद्र पताडे, प्रल्हाद पाटील, सचिन पाटील, अस्लम पठाण, शहाजान पठाण, नरसू गावडे, सिकंदर शेख, शंकर निरटे, अस्लम पठाण, विजय पाटील, दीपक रेडेकर, फत्तेसिंह काटकर, मिलींद झेंडे, रविंद्र खाडे, अनिल पाटील, पांडुरंग वरोटे, आण्णासो पाटील, बसाप्पा मुत्तनवार, मिलन धम्मदिक्षीत, मारुती ठिकारे, शेखर सवतेकर, सुनिल कवळेकर, मानसिंग पाटील, सलीम भालदार, राजाराम बरगे, राजीव शिंदे, वैभव दड्डीकर, सलीम सनदी, शमशुद्दीन पठाण, अनिल पाटील, रघूनाथ नलवडे, महादेव खाडे, संजय घोंगडे, राजकुमार देसाई, चंद्रकांत यादव यांच्या नावाचा समावेश आहे.
Previous Articleअखेर रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळाली कायम ऑर्डर
Next Article सर्वसामान्यांचा ‘लोकनाथ’ आजही लोकप्रिय








