बेडग / वार्ताहर
Sangli News: स्त्री आपलं कुटुंब चालवते,आपला नवरा संसार यांचं ओझं सांभाळते,ती हा जो ताण सांभाळते तो ताण म्हणजेच खरा भारतीय स्त्रीवाद आहे.भारतीय स्त्रीवाद हा स्त्रियांच्या हातात सत्ता गेल्याने वाढीस लागेल तोपर्यंत तो लागणार नाही.इतकेच नव्हे तर स्त्रिया गांभीर्याने लिहायला लागतील तेव्हा पुरुषांना लिहायला जागाच उरणार नाही,कारण लेखक जो लिहितो ते स्त्रियांच्या विषयी लिहितो असे स्त्रीवादाचे नवे रूप प्रा.जी.के.ऐनापुरे यांनी उलगडून दाखवले.
झलकारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आरग यांच्या वतीने गीता पाटील यांच्या हस्ते प्रख्यात साहित्यिक,विचारवंत प्रा.जी.के.ऐनापुरे यांचा एकसष्ठीपूर्ती निमित्त सत्कार व मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आपण निर्मिक आहोत हे जोपर्यंत स्त्रीला समजत नाही किंवा आपण निर्मिक आहोत ही भावना जोपर्यंत तिच्यात रुजत नाही, वाढत नाही तोपर्यंत तिला सर्वार्थाने स्वातंत्र्य प्राप्त होणार नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले.अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या सदस्य सरिता कोरबु होत्या.
मुक्त संवाद या कार्यक्रमात ऐनापुरे यांनी महिलांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.स्त्री आपलं कुटुंब चालवते,आपला नवरा संसार यांचं ओझं सांभाळते,ती हा जो ताण सांभाळते तो ताण म्हणजेच खरा भारतीय स्त्रीवाद आहे.भारतीय स्त्रीवाद हा स्त्रियांच्या हातात सत्ता गेल्याने वाढीस लागेल तोपर्यंत तो लागणार नाही.इतकेच नव्हे तर स्त्रिया गांभीर्याने लिहायला लागतील तेव्हा पुरुषांना लिहायला जागाच उरणार नाही असे स्त्रीवादाचे नवे रूप प्रा.जी.के. ऐनापुरे यांनी उघडून दाखवले.तर जास्त शिकलेली स्त्री जास्त धार्मिक बनते जास्त अंधश्रद्धेच्या आहारी जाते हे शिक्षणातून आलेला बिघाड आहे असे सांगत शिक्षणाविषयी असणारी उदासीनता आणि शिक्षणातून येणारी उदासीनता अशा अर्थाने स्त्रीवादी मोमेंट मधील शिक्षणाचे महत्त्व ऐनापुरे यांनी अधोरेखित केले.

गीता पाटील म्हणाल्या,की अवकाश या कादंबरीतील चंदर हा नायक जितका सहनशील आहे तशी सहनशीलता युवकांत निर्माण व्हावी,यासाठी ऐनापुर यांचे लेखन वाचणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन करतानाच त्यांनी एका लेखकाचा सत्कार महिलांनी करणे ही आनंदाची आणि प्रगल्भतेची बाब असल्याचेही नमूद केले.यावेळी मुक्त संवाद या कार्यक्रमात महिलांच्या प्रश्नांना ऐनापुरे यांनी मनमोकळी उत्तरे दिली.व आरग सारख्या सीमावर्ती भागातील महिलांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीचे कौतुकही केले.त्यापूर्वी एकसष्ठीपूर्ती निमित्त गीता पाटील यांच्या हस्ते प्रा.ऐनापुरे यांचा सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा शशिकला गावडे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा ऐनापुरे यांच्या जन्मदिनानिमित्त संस्थेच्यावतीने जिल्हापरिषद आंतरराष्ट्रीय शाळा नंबर १या शाळेस डायस भेट देण्यात आला.तर पद्मसिंह बाबर यांच्या कडून शाळेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर व म.फुले यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.आदिशक्ती महिला बचत गट,दिशा महिला बचत गट,उमेद महिला बचत गट,तुलसी महिला बचत गट,युक्ती महिला बचत गट या गटांच्या महिलांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल गावडे यांचा सत्कार केला.
हेही वाचा- मंडलिक यांच्या लोकसभेच्या उमेदवारीवरून सतेज पाटील म्हणतात…
यावेळी मंचावर मुख्याध्यापक हरिभाऊ गावडे व संजीवनी पाटील उपस्थित होते. चंद्रकांत बाबर यांनी सन्मान पत्राचे वाचन केले.स्वागत सचिव अधिका बाबर यांनी केले, प्रास्ताविक प्रा. डॉ. मोहन लोंढे यांनी केले तर आभार नंदिता खटावे यांनी मानले. सूत्रसंचालन साक्षी नाईक यांनी केले.यावेळी प्रगतीशील लेखक संघाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष,कृषीतज्ञ प्रमोद पाटील, सचिन चव्हाण, निलेश साठे, हरीश वाघमारे, निशिकांत वाघमारे, शरद कुंभार,अश्विनी इंगळे, सुप्रिया चव्हाण, सीमा पाटील, पुनम पाटील, शुभदा गुरव, संगीता जत्राटे, दर्शना अलासे, रूपाली पाटील,वर्षा लाटवडे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकारी, रमजान, संतोषी माता, प्रारंभ ,इंदिरा गांधी, मायाक्का, युक्ती, शिवशक्ती,नमो बुद्धाय ,आदिशक्ती,समर्थ ,सरस्वती,महाराणी ताराऊ, रमाई ,पंचशील ,उमेद ,समद,सम्यक, रागिनी , बीबी आयेशा, जय जिजाऊ, श्रीनाथ ,भारती ,ईश्वरी, दिशा ,राजमार्ग ,हिरकणी इत्यादी महिला बचत गटांच्या पदाधिकारी व सदस्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.








