Balasaheb Thorat :आपण एकत्र राहिलो तर विधान सभेत १८० आमदार निवडून येतील. सगळे एकत्र राहिलो त्रास होईल पण समन्वय केला, सगळ्यांना सांभाळून घेतले तर आपले सरकार येईल असा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.महाविकास आघाडीच्या बैठकीत त्यांनी आपली भूमिका मांडली.राज्याच्या सत्तासंघर्षावर सध्या सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. यापार्श्वभूमीवर आज ते बोलत होते.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुपारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर मविआतील नेत्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली.उद्धव ठाकरे यांचे भाषण संपत असताना कार्यकर्त्यां मधून घोषणा झाली शरद पवार पंतप्रधान ..यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ते ही चालेल,आधी एकत्र येऊन लढले पाहिजे तंगड्यात तंगडी घालू नका असेही ते म्हणाले.
आपल्या पक्षाच्या पदरात काही नाही पडले तरी चालेल पण भाजप बरोबर युती करणार नाही हे ठरवा असा सल्ला ही उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला. शिंदे गटावर टीका करताना उद्धव ठाकरे आक्रमक झाले. मराठ्यांना फुटीचा शाप आहे. एखादे नगसेवक तिकीट,आमदारकी,खासदारकीच्या तिकीट नाही मिळाले तर चालेल का? चालले पाहिजे..कारण लोकशाही साठी एकत्र राहिले पाहिजे नाहीतर २०२४ निवडणूक शेवटची ठरेल असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








