बेळगाव प्रतिनिधी – बेकिनकेरे – अगसगा मार्गावर असलेल्या एका गोठ्याचा दरवाजा तोडून तीन शेळ्या चोरांनी पळविल्या आहेत. बुधवारी दिवसाढवळ्या ही घटना घडली आहे. राजू सनदी असे शेळीमालकाचे नाव असून त्यांना 40 हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. घटनेची अधिक माहिती अशी की विजयादशमी निमित्त सनदी कुटुंबीय गावातील नागनाथ मंदिराकडे गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यानी समोरील दरवाजाने गोठ्यात प्रवेश करून पाठीमागील दरवाज्याने तीन शेळ्या पळविल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरटयांनी आता ग्रामीण भागातील शेळ्या- मेंढ्या, देखील लक्ष्य केल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. सदर घटनेचा तपास करून ग्रामीण भागात पोलीस तैनात करावेत, अशी मागणी होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









