विनोद सावंत, कोल्हापूर
Kolhapur News : पंचगंगा स्मशानभूमीत कोल्हापूर महापालिकेने दोन दानपेट्या ठेवल्या आहेत. यापैकी एका पेटीवरच चोरांनी डल्ला मारला आहे. मनपा प्रशासनाने मंगळवारी पेटी उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. काठीला डिंक किंवा चिकट पदार्थ लावून दानपेटीच्या फटीतून नोटा बाहेर काढल्याचा संशय मनपा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी बाजारीतील काही प्रभावी कंपन्यांचे डिंक वापरण्यात आले आहेत.
कोल्हापूर महापालिकेच्या शहरात पंचगंगासह चार ठिकाणी स्मशानभूमी आहेत. यामध्ये शहरातील सर्वात जुनी आणि धार्मिक महत्व असल्याने पंचगंगा स्मशानभूमीतच सर्वाधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. विशेष म्हणजे शहरालगतच्या पाच ते सहा गावातील मृतांवरही येथे अंत्यसंस्कार होतात. सरासरी रोज 10 ते 15 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. विशेष म्हणजे मनपा ही सेवा मोफत देते.
मनपाने येथे दोन दानपेटी ठेवली आहेत. येथे दानशूर व्यक्ती सढळ हाताने पैसे टाकतात. महापालिकेने मंगळवारी स्मशानभूमीच्या कार्यालया शेजारी असलेली पेटी उघडली. यामध्ये 3 लाख 86 हजार रूपये आढळून आले. परंतू यामधील काही नोटांना डिंक लागल्याचे आढळून आले. यावरून पेटीतील पैसे चोरले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. काठीला डिंक लावून दानपेटीच्या फटीतून आत घालून नोट चोरल्या जात असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
चार हजारांच्या नोटा बाद
दानपेटी उघडल्यानंतर अनेक नोटांना डिंक लागल्याने खराब झाल्या आहेत. यामुळे 4 हजार 117 रूपयांच्या नोटा वापरात येवू शकत नाहीत. खराब झालेल्या नोटा सोडून काही नोटा बाहेर काढल्याची शक्यता आहे. एक व दोन रूपयांच्या नाण्यांनाही डिंक लागला आहे.स्मशानभूमीतील पैशावरही डल्ला मारण्याचा हा प्रकार नक्कीच चुकीचा आहे.
गतवर्षीच्या तुलनेत एक लाखांने रक्कम कमी जमा
गतवर्षी दानपेटीत 4 लाख 95 हजार रूपये जमा झाले होते. यावर्षी 3 लाख 86 हजार जमा झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत एक लाखांने रक्कम कमी जमा झाली आहे. 2020 ते 22 या तीन वर्षात स्मशानभूमीत दानपेटीत तब्बल 14 लाख 45 हजार जमा झाले होते. हे तीन वर्ष शहरात कोरोनाची साथ होती. अशा स्थितीही दानपेटीत पैसे जमा झाले होते. सरासरी वर्षाला साडे चार लाख रूपये जमा होतात असे दिसून येते. मग या वर्षीच एक लाखाने रक्कम कमी जमा झाली आहे. यामुळेच दानपेटीतील पैसे चोरी होत असल्याचा संशय बळवला आहे.
दानपेटीसोबत पावतीबुकही ठेवा
स्मशानभूमीसाठी अनेक लोक मदत करतात. बडोदा येथील एकाने 35 लाखांची गॅस दाहिनी दिली आहे. मारवाडी समाज आणि सलून व्यावसायिकांनी कव्हर शेड उभारले आहे. दरवर्षी लाखो शेणीदान स्वरूपात जमा होतात. तर काही दानशूर व्यक्तींना स्मशानभूमीसाठी मदत करायची असते. परंतू नाव जाहीर करायचे नसते. असे अनेक व्यक्ती स्मशानभूमीतील दानपेटीत पैसे टाकत असतात. पंरतु दानपेटीतील पैसे चोरीस जात असल्याने स्मशानभूमीत पावतीबुक ठेवून रोख पैसे जमा करून घेण्याची सुविधा करणे आता गरजेची बनले आहे.
पोलीसांनी गस्त घालण्याची गरज
शिवाजी पूल, स्मशानभूमी ते जुना बुधवार तालीम या मार्गावर रात्रीच्या वेळी मद्यपी, गांजा ओढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भुरट्या चोरांचाही वावर वाढला आहे. दानपेटीतील पैसे चोरीला जात आहेत. त्यामुळे या परिसरात पोलीसांनी रोज रात्री दोन ते तीन वेळा गस्त घालणे आवश्यक आहे.
वर्ष दानपेटीत जमा रक्कम
2021 9 लाख 50 हजार
2022 4 लाख 95 हजार
2023 3 लाख 86 हजार
पाच वर्षाच्या तुलनेत यंदा दानपेटीत 60 ते 70 हजारांना रक्कम कमी जमा झाली आहे. शिवाय दानपेटीतील चार हजारांच्या नोटा डिंक लावल्याने खराब झाल्या आहेत. यामुळे दानपेटीतून पैशाची चोरी होत असल्याचा संशय आहे. रात्रीच्यावेळी येथील कर्मचारी स्मशानभूमीत दहनासाठी जातात. कार्यालयात कोणीही नसते. अशावेळी चोरी झाल्याची शक्यता आहे.
डॉ. विजय पाटील, प्रभारी सहायक आयुक्त, महापालिका
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









