मॉर्निंग वॉकदरम्यान चोरांना पळविला मोबाइल
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाममध्ये एक चकित करणारा प्रकार घडला आहे. तेथे पोलीस मुख्यालयानजीकच्या भागात दुचाकीस्वार गुंडांनी पोलीस उपमहानिरीक्षक (कायदा-सुव्यवस्था) विवेक राज सिंह यांचा मोबाइल चोरला आहे. ही घटना उलुबरीमध्ये सिंह हे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले असताना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तिन्ही गुडांचा शोध सुरू केला आहे.
मजार रोड मध्य गुवाहाटीत पोलीस मुख्यालयापासून काही अंतरावरच आहे. भारतीय पोलीस सेवेच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची अधिकृत निवासस्थाने याच परिसरात आहेत. या प्रकरणी आम्ही तपास करत आहोत असे गुवाहाटीचे सहाय्यक पोलीस आयुक्त पृथ्वी राजखोवा यांनी सांगितले आहे. विवेक राज सिंह हे मॉर्निंग वॉक करत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी त्यांच्या हातून मोबाइल हिसकावून घेत पलायन केले आहे.









