प्रतिनिधी,खेड
मुंबई-गोवा महामार्गावर खेड जवळ विश्रांतीसाठी थांबलेल्या कंटेनर मधून १०१ औषधांच्या बॉक्सची चोरी होण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत फिर्यादी मोहम्मद अन्सारी याने खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
यातील फिर्यादी अन्सारी हा कंटेनर घेऊन मुंबई-गोवा महामार्गाने जात असता त्याला झोप आल्याने त्याने जांभुर्डे शाळेजवळ कंटेनर उभा करून ठेवला. फिर्यादी हा झोपलेला असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने कंटेनरच्या दरवाजाचे कुलूप तोडून फिर्यादीच्या ताब्यात असलेल्या कंटेनर मधील एकूण ४६८ औषधाच्या बॉक्स पैकी १०१औषधाचे बॉक्स चोरून नेले. याप्रकरणी खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









