पांगुळ गल्लीत घर फोडून 4 लाखाचा ऐवज लंपास
बेळगाव : एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे 4 लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज पळविण्यात आला आहे. रविवारी भरदिवसा शहराच्या मध्यवर्ती भागातील पांगुळ गल्ली येथे ही घटना घडली आहे. पांगुळ गल्ली येथील नितीन प्रकाश शिंदे यांच्या घरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी सुमारे साडेचार तोळे सोन्याचे दागिने व 7 हजार रुपये रोख रक्कम पळविल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. घटनेची माहिती समजताच मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यासंबंधी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.









