दोन दुचाकींसह तिघे भामटे सीसीटीव्हीत कैद
वार्ताहर / बेडकिहाळ
चिकोडी तालुक्यातील वडगोल येथील जागृत दैवत मुतलकोडी श्री बिरेश्वर मंदिरात चोरट्यांनी दानपेटी पळविल्याची घटना गुऊवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान सदर चोरटे सीसीटीव्ही पॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नेहमीप्रमाणे मंदिरात दिवसभर देवदर्शन व कौल लावण्यासाठी भाविकांची गर्दी होती. 14 रोजी रात्री 9 वा. मंदिराच्या मागील बाजूला काही भाविकांनी प्रसादाचे आयोजन केले होते. रात्री 11 पर्यंत भाविक मंदिराच्या मागील बाजूस प्रसाद घेत होते. दरम्यान रात्री 12.45 च्या सुमारास मंदिरात कोणी नसल्याचे पाहून तिघा चोरट्यांनी दानपेटी पळविली. पाहणी केली असता चोरटे कैद झाल्याचे आढळून आले. यात दोघे चोरटे दानपेटी खांद्यावऊन नेत असल्याचे दिसून आले. तसेच फुटेजमध्ये दोन दुचाकीही आढळून येत असून चोरटे तिघे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर घटनेची नोंद सदलगा पोलिसात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
चार दिवसात चोरीची दुसरी घटना
शमनेवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर व मातंग गल्ली परिसरात चोरट्यांनी एका रात्रीत तब्बल 8 कुलूपबंद घरे शनिवार 11 रोजी फोडून ऐवज लांबविला होता. ही घटना ताजी असतानाच मंदिरातील दानपेटी लांबविल्याची घटना घडल्याने पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान निर्माण झाले असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या चोरी प्रकाराची दखल घेत तपासाची गती वाढविताना चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









