वार्ताहर, राजापूर
राजापूर तालुक्यातील सरीता मापन केंद्र,काकेवाडी,मोरोशी माळवाडी ता.राजापूर जि.रत्नागिरी येथील हवामान केंद्रावर असलेला सुर्यतापी काचेचा गोळा,पितळेची चंद्राकृती बॉडी,त्याचे इतर पितळी पार्ट व सूर्य किरण तापन मोजणी पुट्टयाचा ग्राफ अश्या शासकिय वस्तू अज्ञाताने चोरुन नेल्याची फिर्याद राजापूर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
हि घटना दिनांक ३०/१०/२०२२ रोजी सकाळी घडली असून यांची नोंद ९ जानेवारी २०३३ रोजी पोलीस ठाण्यात करण्यात आली.याबाबतची फिर्याद यशवंत विश्राम कानडे (५३)यांनी दिली. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.
Previous Articleस्कूल बसखाली सापडून ५ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
Next Article भाजप गंगेसारखा; डुबकी मारल्यास होईल पापांची मुक्तता









