इर्न्व्हटरच्या बॅटऱ्यांसह पूजेचे साहित्य लांबविले
बेळगाव : शिवबसवनगर येथील श्री जोतिबा मंदिराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी आत प्रवेश करून इर्न्व्हटरच्या बॅटऱ्या व पूजेचे साहित्य लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकामध्ये मंदिराच्या ट्रस्टींनी फिर्याद दिली आहे. श्र् ााr जोतिबा मंदिराच्या पूर्वेकडील बाजूला असलेल्या खिडकीतून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर मंदिरामध्ये असलेल्या इर्न्व्हटरच्या बॅटऱ्या आणि तांब्या-पितळेचे पूजेचे साहित्य लांबविले आहे. जवळपास 60 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. मंदिरात चोरी केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मंदिरांना चोरट्यांनी लक्ष्य बनविले आहे. तेव्हा पोलिसांनी आता गस्त घालावी, अशी मागणी होत आहे.









