शिरोळ प्रतिनिधी
Kolhapur News : येथील गणेशनगरमध्ये घराचा कडीकोंडा काढून सोन्या,चांदीच्या दागिन्यासह रोखरक्कम असा एकूण 3लाख 23 हजार रुपयेचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.याबाबतची फिर्याद राजेश रमेश मोरे (रा.शिरोळ) यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली आहे.या घटनेमुळे शिरोळ परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, येथील गणेशनगरमध्ये राजेश मोरे कुटुंबियांचे घर आहे.रविवार (दि.23) रात्री यात्रेनिमित्त मोरे निगवे येथे गेले होते. घरात कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी बंद असलेल्या घरावर डल्ला मारला. रविवारी रात्री ते सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याची कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला.त्यानंतर घरातील कपाटामध्ये असणारे 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे,5 नग अंगठी,3 नग टॉप्स तर चांदीच्या दागिन्यात 2 नग वाट्या,1 आत्तरदानी,नेकला,पैंजण,जोडवी,अन्नपूर्णादेवीची व गणपतीची मूर्ती,ताट,तांब्या असा एकूण 1200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम 1 लाख 23 हजार असा एकूण 3 लाख 23 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. या चोरीची फिर्याद शिरोळ पोलीस ठाण्यात सोमवारी देण्यात आली.
दरम्यान, शिरोळ पोलिसांनी सोमवारी सकाळी घटनास्थळाची पाहणी करून ठस्से तज्ञ व श्वानपथकाला पाचारण केले.ठसे तज्ञ पथकाकडून घरातील ठसे घेण्यात आले त्यानंतर श्वान पथक घटनास्थळी घुटमळले.भर वस्तीत अज्ञात चोरट्यांनी बंद असलेले घर फोडून चोरी केली असल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









