न्हावेली / वार्ताहर
श्री देव गिरोबा युवक नाट्य मंडळ,आरोस आयोजित श्री देव गिरोबा रंगमंच आरोस गिरोबावाडी येथे रामनवमी निमित्त रविवार ३० मार्च ते ७ एप्रिलपर्यंत सायंकाळी ७.वाजता सुश्राव्य किर्तन व नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार ३० मार्च रोजी रात्री ९.३० वाजता श्री देव सातपाटेकर दशावतार नाट्यमंडळ,निरवडे यांचा ‘ शिवकंठ भूषण वासुकी’ सोमवार ३१ रोजी रात्री ९.३० वाजता श्री बाळा सावंत दशावतार नाट्यमंडळ,नेरुर असरोंडी यांचा ‘ कन्या झाली वैरीण ‘ मंगळवार १ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता श्री देव हेळेकर दशावतार नाट्यमंडळ,कारिवडे सावंतवाडी यांचा ‘ विकर्णासुर ‘ बुधवार २ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता श्री जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ,आरोस दांडेली यांचा ‘ कालचक्र ‘ गुरुवार ३ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ,चेंदवण ( देवेंद्र नाईक ) यांचा ‘ शिवभक्त शबर ‘ शुक्रवार ४ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ,नेरुर ( भाई कलिंगण ) यांचा ‘ शततारका नक्षत्र ‘ रविवार ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता ‘ रामजन्म ‘ सायंकाळी ७ वाजता मुरगांव वारकरी संस्था वास्को गोवा यांचा हरिपाठ व दिंडी कार्यक्रम,रात्री १० वाजता श्री देव गिरोबा युवक नाट्यमंडळ,आरोस यांचा दोन अंकी नाटक ‘ प्रश्न तुमच्या निर्णयाचा ‘ सोमवार ७ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ,नेरुर ( सुधीर कलिंगण ) यांचा ट्रिकसिनयुक्त नाटक ‘ जय जय रवळनाथ ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन श्री देव गिरोबा युवक नाट्यमंडळ आरोस यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









