रु
बेळगाव/ प्रतिनिधी
बॉलीवूड चित्रपटातील आघाडीचे गायक बेन्नी दयाल यांनी बेळगावच्या तरुणाईला आपल्या सुरेल गाण्यांद्वारे थिरकायला लावले. एकापेक्षा एक सरस व तरुणाईला भिडणारी गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तरुणांसोबत तरुणींचाही उत्साह केएलएस जीआयटीच्या ‘ऑरा 2023’ मध्ये पाहायला मिळाला.
प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी कॉलेजतर्फे ऑरा सांस्कृतिक फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शनिवारी रात्री गायक बेंनि दयाल यांचा लाईव्ह कन्सल्ट कार्यक्रम झाला. ‘कैसे मुझे तुम मिल गई’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर त्यांनी आपण गायलेली उडत्या चालीवरची गाणी सादर केली. तरुणांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. प्रत्येक गाण्यावर बेभान होऊन युवा वर्ग डान्स करत होता.
त्यांनी घुमरू, बँग बँग ,लत लग गई, बत्तमीज दिल, जय जय शिवशंकर, बेफिक्रे यासारखी गाणी सादर करून लाईव्ह शो मध्ये रंगत आणली. केएलएस व्यवस्थापन मंडळतर्फे गायक दयाल यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्राध्यापक, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तसेच विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









