सातार्डा : रायाचेपेड येथील जगन्नाथ राऊळ यांच्या घरच्या अंगणात आलेली सहा फुटी मगर रायाचेपेडमधील तरुणांनी पकडली . बुधवारी रात्री पावणेएक वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.मध्यरात्रीच्यावेळी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आल्याने जगन्नाथ राऊळ घरा बाहेर आले. अंगणात त्यांना मगर असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी कुटुंबीय व शेजाऱ्यांना बोलावले. बाबी राऊळ, बाळ आरोंदेकर, विजय कांबळी,सत्यवान राऊळ,सुरज राऊळ, भिकाजी राऊळ यांनी त्या मगरीला रस्सीने बांधून ठेवले. मगर बांधून ठेवल्याची माहिती डॉ रवींद्रनाथ रेडकर यांना दिली. डॉ रेडकर व भिकाजी राऊळ यांनी ती मगर गुरुवारी सकाळी रायाचेपेड – पाटोपूल याठिकाणी तेरेखोल नदीपात्रात सोडली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









