किंवा ते ही कला शिकू इच्छित नाहीत. अशाच एका युवतीने स्वयंपाक शिकणे टाळले आणि आता ती 10 वर्षांपासून केवळ बाहेरचं खात आहे.
मी माझ्या आयुष्यातील अनेक तास शेगडीसमोर घालवू इच्छित नाही. माझे आरोग्य चांगले नसल्याचे लोकांना वाटते, परंतु मी आनंदी आहे. हेच जीवन मला चांगले वाटते आणि मी स्वत:चे जीवन जगत आहे आणि स्वत:च्या वेळेचा योग्य वापर करत असल्याचे या युवतीने सांगितले आहे.
सॅफरन बोसवेल नावाची ही युवती दररोज बाहेरचे अन्न खात असते. सॅफरन मागील 10 वर्षांपासून केवळ बाहेर हॉटेल आणि रेस्टॉरंटमधून अन्न मागवत खात आहे. भले मग हा नाश्ता असो किंवा लंच किंवा डिनर. आठवड्यातील सातही दिवस ती बाहेरच खात असते. यावर ती महिन्याकाठी 500 डॉलर्स म्हणजेच 56 हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च करते, परंतु स्वयंपाक करण्याचा त्रास घेत नाही. मला बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे आवडते, तर हजारो रुपये खर्च करून मी स्वत: स्वयंपाक केला आणि तो खराब ठरला तर योग्य नसेल असे तिचे म्हणणे आहे.
स्वयंपाकापेक्षा अधिक स्वस्त
मला स्वयंपाक पसंत नाही, मी अनेकदा प्रयत्न केला, तो फसल्याने मी पुन्हा स्वयंपाकाच्या फंदात पडले नाही. स्वयंपाक करण्यापेक्षा बाहेरून खाद्यपदार्थ मागविणे स्वस्त देखील ठरते. मी एकटीच राहते आणि अनेकदा सबवे सँडविच, पिझ्झा एक्स्प्रेसमधून पिझ्झा किंवा केएफसीमधुन बर्गर अणि सॅलड मागवून खाते. अशाप्रकारे दिवसात 6817 रुपये तीन टाइमच्या खाण्यावर खर्च होतात. तरीही स्वयंपाकासाठी शॉपिंग करण्यापेक्षा अधिक सोपे आणि स्वस्त खाद्यपदार्थ बाहेरून मागविणे असल्याचे तिचे सांगणे आहे.









