एका 17 वर्षीय मुलीने स्वत:च्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होते. याकरता तिने एक प्लेलिस्ट तयार केली असून यात तिच्या पसंतीची गाणी होती. ही मुलगी कॅन्सरने ग्रस्त होती. ब्रिटनच्या कार्डिफमध्ये राहणाऱ्या या मुलीचे नाव एडेन लुइस आहे. तिला स्वत:कडे आता जगण्यासाठी फारसा काळ शिल्लक नसल्याची जाणीव होती. परंतु बसून राहत मृत्यूची प्रतीक्षा करू इच्छित नाही, जीवन केवळ जगण्यासाठी असते असे म्हणत एडेन प्रत्येक क्षण आनंदी ठरावा यासाठी प्रयत्न केला होता. याचमुळे ती स्वत:च्या शाळेतील समारंभात सामील झाली आहे. 21 जून रोजी ती स्वत:चा आयडॉल हॅरी स्टाइल्सचा कॉन्सर्ट पाहण्यासाठी गेली होती. जेव्हा मृत्यू होईल तेव्हा अंत्यसंस्कारात माझ्या पसंतीची गाणी लावली जावीत, असे तिचे सांगणे आहे. प्लेलिस्टमध्ये हॅरी स्टाइल्सची दोन गाणी सामील आहेत. मी दिवसभरात रिपीट मोडमध्ये हॅरीची गाणी ऐकत असते. माझ्या अंत्यसंस्काराच्या प्लेलिस्टमध्ये यातील गाणी सामील आहेत. पॅन्सरच्या या प्रवासात हे जग सोडून जाताना कसे वाटायला हवे याविषयी हॅरीच्या गाण्यांनी मला मदत केली असल्याचे एडेन सांगते. एडेनने कॉन्सर्ट व्हिलचेअरवरून बसून ऐकला होता. तिला संगीत अत्यंत आवडले होते. गाणी ऐकताना आमच्या डोळ्यांमधून अश्रू ओघळत होते. माझ्यासाठी एडेनला एडेनप्रमाणे पाहणे आनंददायी होते. आम्ही जपानी रेस्टॉरंटमध्ये जात खाद्यपदार्थांचा आनंद घेतला, कार्डिफमध्ये एकत्र वेळ घालविल्याची एडेनच्या आईने सांगितले.
2020 मध्ये कॅन्सरचे निदान
जून 2020 मध्ये एडेनला बोन कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. त्याचवर्षी किमियोथेरपी झाली आणि ट्यूमर काढण्यासाठी शस्त्रक्रिया देखील झाली. यानंतर कॅन्सर पुन्हा शरीरात पसरला आहे. तिच्या गुडघ्यावरही शस्त्रक्रिया झाली आहे. ती आता ओ^स्टयोसारकोमाने पीडित असून पॅन्सर फुफ्फुसांपर्यंत फैलावला आहे. एडन आई टेस, सावत्र वडिल कॅमेरून (39 वर्षे), सहा वर्षीय भाऊ लोगान आणि दोन वर्षीय बहिण फाओरासोबत राहते.









