खर्च करत नाही एकही पैसा
ज्या व्यक्तीला हिंडण्या-फिरण्याचा छंद असतो, तो नेहीमच कमी पैसे खर्च करून अधिकाधिक ठिकाणी फिरत राहण्याची इच्छा बाळगून असतो. सर्व लोक स्वत:च्या बजेटनुसार प्रवासयोजना आखत असतात. तर काही स्मार्ट लोक कुठेही गेले तरीही पैशांशिवाय तग धरण्याची कला जाणून असतात. एका देशातून दुसऱ्या देशात जात फिरण्याचा प्लॅन असे लोक कुठल्याही बजेटशिवाय तयार करत असतात.
हा प्रकार अजब वाटत असला तरीही कॅनडात राहणाऱ्या एका युवतीने अशी ट्रिक शिकली आहे, की अनेक देशांमध्ये मोफत फिरून आली आहे. तिने स्वत:च्या ट्रिपवर एकही पैसा खर्च केला नाही, उलट लाखो रुपये कमावून आली आहे अखेर हे ती कसे साध्य करते हे जाणून घेणे रंजक आहे.
ज्या सुंदर देशात फिरण्यासाठी लोक अनेकदा रितसर प्लॅनिंग करतात, तेथे हैली लियमंथ नावाची युवती फुकट फिरून आली आहे. 25 वर्षीय हैलीने ‘मोफत प्रवास कसा करावा’ असा ऑनलाइन सर्च केला. यानंतर तिने कॅनडाहून ऑस्ट्रेलियाची ट्रिप निश्चित केली. या ट्रिपमध्ये ती कुठल्याही हॉटेलमध्ये थांबली नाही तसेच कुठल्याही हॉस्टेलमध्ये राहिली नाही. ती ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांच्या घरात मोफत राहत होती. तिथे तिचे कुणीच नातलग नव्हते, तिने तेथील लोकांच्या घरात पाळीव प्राण्यांच्या देखभालीचे काम केले आहे. हैली तेथे 6 दिवसांपासून 3 महिन्यांपर्यंत नोकरी करायची आणि मोफत राहायची.
हैलीने स्वत:च्या पूर्ण ट्रिपमध्ये श्वान, मांजर, कोंबडी आणि गायींची देखभाल केली आहे. हा प्रकार करून तिने ब्रिस्बेन, हिंटरलँड आणि गोल्ड कोस्ट यासारख्या ठिकाणी मोफत राहून लाखो रुपये वाचविले आहेत. हैली हे पेशाने छायाचित्रकार असून तिने अशाच गावांमध्ये आणि दुर्गम क्षेत्रातील घरांमध्ये राहून सुमारे 10 लाख रुपये वाचविले आहेत. ती प्राण्यांसोबत नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत राहिली आणि यादरम्यान तिने एकही पैसा खर्च केला नाही.









