वार्ताहर /कडोली
केदनूर येथे गेल्या 8-9 दिवसांपासून सुरू असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या (बचनट्टी) यात्रोत्सवाचा सांगता समारंभ सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. कोणतीही अनुचित घटना न घडता यात्रा सुरळीत पार पडली. दि. 27 फेब्रुवारीपासून केदनूर श्री महालक्ष्मी देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला होता. यात्रोत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम सुरळीत पार पडले. सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी यात्रा सुरळीत पार पाडून सहकार्य केल्याबद्दल देवस्थान पंच कमिटी आणि हक्कदार यांनी आभार मानले आहेत. सोमवारी यात्रेच्या सांगता समारंभात देवीची पुजा करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी दोन ते तीन तास देवीला खेळविण्यात आले. त्यानंतर देवीला सीमेवर घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी यात्रेची सांगता करण्यात आली.









