जगातील अनेक ठिकाणांना तुम्ही भेट दिली असेल, परंतु जग कुठे संपते हा प्रश्न कधी तुमच्या मनात आला आहे का? एका ठिकाणी जग संपत असल्याचे मानले जाते. या ठिकाणी एक रस्ता असून त्याला जगातील अखेरचा रस्ता मानले जाते. या रस्त्यानंतर जग संपत असल्याचे मानण्यात येते.
या रस्त्याचे नाव ई-69 हायवे असून याला जगातील अखेरचा रस्ता म्हटले जाते. युरोपीय देश नॉर्वेमध्ये हा ई-69 हायवे आहे. हा हायवे संपल्यावर केवळ ग्लेशियर आणि समुद्र दिसून येतो. ई-69 हायवे 14 किलोमीटर लांबीचा आहे. या हायवेवरील अनेक ठिकाणी वाहन चालविण्यास आणि एकटय़ाने पायी चालण्यास मनाई आहे.

14 किलोमीटर लांबीच्या ई-69 हायवेला जगातील अखेरचे टोक मानले जाते. पृथ्वीच्या उत्तर धूवानजीक हा रस्ता आहे. या ध्रूवाला आणि नॉर्वेला ई-69 हायवे जोडतो. या हायवेनंतर अन्य कुठलाच मार्ग नाही. केवळ बर्फच बर्फ अन् समुद्रच नजरेस पडतो.
जगातील अखेरचा रस्ता पाहण्यासाठी लोक तेथे पोहोचतात. परंतु या रस्त्यावर एकटय़ाने जाण्यास आणि वाहन चालविण्यास मनाई आहे. या रस्त्यावर फिरण्याची इच्छा असल्यास समुहात जावे लागते, कारण बर्फच बर्फ असल्याने लोक अनेकदा वाट चुकत असतात. तसेच हा भाग अत्यंत थंड आहे. उत्तर ध्रूवानजीक असल्याने या रस्त्यावर हिवाळय़ात केवळ रात्रच असते तर उन्हाळय़ात कधीच सूर्यास्त होत नाही.
या ठिकाणी सलग 6 महिन्यांपर्यंत सूर्य उजाडत नाही आणि केवळ रात्रच असते. तर 6 महिन्यांपर्यंत लोक केवळ रात्रीच्या काळोखातच राहतात. उन्हाळय़ात येथील तापमान शून्य अंश सेल्सिअसच्या आसपास राहते. तर हिवाळय़ात येथील तापमान उणे 45 अंश सेल्सिअसपर्यंत खालावते.









