व्होळे गावातील रस्त्याचे डांबर तीन महिन्यात उखडले!
लऊळ : माढा तालुक्यातील व्होळे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामां नंबर १७ हा रस्ता बांधकाम विभाग २ सोलापूर यांच्याकडून डांबरीकरण व कॉक्रिट करण्यात आले आहे. परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याची माहिती समोर येत असून रस्त्याचे डांबर हे ३ महिन्यात उखडल्याचे दिसत आहे.
या संदर्भात काम सुरू असताना संबंधित अधिकारी यांना कळवून देखील कानाडोळा केल्याचे समजत असून काम पूर्ण झाल्यानंतर एम बी काढण्यासाठी काम है फलकावर २, ०२, ८३, ५७९ रुपये रकमेचे दाखवण्यात आले आहे. मात्र हे काम एवढ्या रकमेचे झालेले नाही तरी संबंधित कामाची चौकशी करून ठेकेदार व अधिकारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी कुंदन वजाळे यांनी केली आहे.
झालेल्या निकृष्ट रस्त्याचा संबंधित अधिकाऱ्यांकडून न झाल्यास आंदोलन करणार असल्याची माहिती कुंदन वजाळे यांनी दिली.








