प्रतिनिधी /बेळगाव
अतिवाड गावच्या प्रवेशद्वारावर कमी उंचीवर लोंबकळणाऱया विद्युततारांमुळे ग्रामस्थांना धोका निर्माण झाला होता. याबाबत ‘तरुण भारत’ वृत्तपत्रातून ‘अतिवाडच्या प्रवेशद्वारावरच धोकादायक विद्युततारा’ या मथळय़ाखाली वृत्त प्रसिद्ध होताच हेस्कॉमला जाग आली अन् तातडीने धोकादायक विद्युततारा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
शाळेच्या प्रवेशद्वारावर धोकादायक विद्युततारा लोंबकळत होत्या. त्यामुळे शाळकरी, विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना भीतीच्या छायेखाली वावरावे लागत होते. या ठिकाणी बसस्थानक असल्याने प्रवाशांचीही वर्दळ अधिक असते.. दरम्यान, हेस्कॉमने याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांना ये-जा करणे धोक्मयाचे बनले होते. अखेर वृत्तपत्रातून बातमी प्रसिद्ध होताच हेस्कॉमने कामाला चालना दिली. या ठिकाणी असलेल्या वीज ताराबरोबर
ट्रान्स्फॉर्मरही वर्दळीच्या ठिकाणी होता. या ट्रान्स्फॉर्मरवरून अतिदाबाच्या विद्युततारा ओढल्या गेल्या होत्या. त्यामुळे विद्युततारांची उंची वाढवून ट्रान्स्फॉर्मर इतरत्र हलवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. कमी उंचीवर असणाऱया विद्युततारांमुळे बैलगाडी किंवा ट्रक्टरला ये-जा करणे धोक्मयाचे बनले होते. दरम्यान, तारांचा स्पर्श झाल्यास मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, हेस्कॉमने त्वरित दखल घेऊन धोकादायक विद्युततारांचे काम हाती घेतले आहे.









