माजी पंचायत मंत्री वेंकटेश देसाई यांचे प्रतिपादन, होंडा आजोबा देवस्थानच्या श्रावण मासानिमित्त कार्यक्रमाचा शुभारंभ
प्रतिनिधी /वाळपई
मंदिरे ही समाजामध्ये फूट पडणारी असू शकत नाहीत .मंदिराच्या माध्यमातून आपल्या समाजाचा विकास आतापर्यंत चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आपली संस्कृती परंपरा अबाधित ठेवताना समाजाची वैचारिक पातळी विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून कार्य होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी पंचायत मंत्री व्यंकटेश उर्फ बंडू देसाई यांनी केले आहे. होंडा येथील आजोबा देवस्थानाच्या श्रावण मासानिमित्त कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या देवस्थानातर्फे श्रावण मासानिमित्त दर दिवशी वेगवेगळय़ा प्रकारचे सांस्कृतिक ,मनोरंजन ,अध्यात्मकि वैचारिक स्वरूपाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी व्यासपीठावर गोवा राज्याचे माजी आमदार प्रताप गावस साखळी नगरपालिकेच्या नगरसेविका कुंदा माडकर ,कुडणे देवस्थानचे अध्यक्ष उदय मळीक, पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत ,ज्ये÷ नाटय़कर्मी अभय जोग,आजोबा देवस्थानाचे अध्यक्ष प्रशांत देसाई ,माजी अध्यक्ष तथा सल्लागार प्रकाश गावस, कार्यक्रमा समितीचे अध्यक्ष विठोबा वांतेकर देवस्थानचे माजी अध्यक्ष तथा सल्लागार सुरेश माडकर, महिला समितीच्या अध्यक्षा अर्चना कोरगावकर व इतरांची उपस्थिती होती.
माजी आमदार प्रताप गावस यानी सांगितले की या देवस्थानाच्या माध्यमातून एक वेगळय़ा प्रकारचा उत्साह भाविकांमध्ये निर्माण झालेला आहे .याला खरोखरच कार्यकारी समितीची चांगली मेहनत जबाबदार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले . येणाऱया काळातही देवस्थानाच्या भरभराटीसाठी आवश्यक स्वरूपाचे सहकार्य देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
आजोबा देवस्थानाच्या माध्यमातून सामाजिक चळवळीला चांगल्या प्रकारची बळकटी प्राप्त झालेली आहे. देवस्थाने ही प्रत्येक भाविकांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र बनल पाहिजे असे स्पष्ट करून त्यांनी देवस्थान समिती करीत असलेले कार्य हे इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सत्तरी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय सावंत म्हणाले.
नाटय़कर्मी अभय जोग, प्रकाश गावस सुरेश माडकर, महिला समितीचे अध्यक्ष अर्चना कोरगावकर यांनी यावेळी आपले विचार मांडले. देवस्थानचे अध्यक्ष प्रशांत देसाई यांनी यावेळी देवस्थानतर्फे आयोजित करीत असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.
सुरुवातीला पारंपरिक समय प्रज्वलित करून या श्रावण मास कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे अमरनाथ कोरगावकर, धर्मेंद्र शिरोडकर, राघोबा परब, रामनाथ गावडे, नारायण दुलबाजी, जयसिंग पाटील, संगिता बांदोडकर, के.पलानी स्वामी, संदीप गावडे, संध्या नाईक, हरिश्चंद्र गावडे यांनी पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत केले. देवस्थान समितीचे खजिनदार सत्यवान नाईक यांनी देवस्थाना संबंधीत विस्तृत माहिती दिली. देवस्थान समितीचे सचिव अनंत धुमे यांनी देवस्थानाच्या कार्याचा अहवाल सादर केला. सूत्रसंचालन सुनिता परब यांनी केले तर विठोबा वांतेकर यांनी आभार मानले. त्यानंतर स्थानिकातर्फे पारंपारिक भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.









