मनोज परब यांनी मांडली शेतक्रयांची व्यथा, प्रशासनाला आली जाग
पणजी : काही दिवसापूर्वीच मनोज परब यांचा आसगाव येथे दौरा झाला होता. यावेळी शेतक्रयांनी त्यांच्याकडे आपले प्रश्न मांडले होते. त्यांनी थेट शेताचा बांध गाठून शेतक्रयांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. मनोज परब याच्याच मार्गदर्शनाखाली शेतक्रयांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. रेव्होलुशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी स्वत: हा विषय म्हापसा इथल्या विभागीय कृषी कार्यालयाला त्याचबरोबर जलसंपदा विभागातील अभियंत्याला सुद्धा भेट देऊन समजावला होता. यावेळी परब तसेच शेतक्रयांना त्यांचा हा शेतातील बांधचा प्रश्न लवकरात लवकर मिटविण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. आज आसगाव मधील शेतावर बांधचे काम हाती घेण्यात आले असून, प्रशासनाकडून दिलेले आश्वासन पूर्ण होताना दिसत आहे. रेव्होलुशनरी गोवन्स ने हा शेतक्रयांचा विषय ताणून धरल्यामुळे आज त्यांचा हा प्रश्न मिटत असल्याने सर्व शेतकरी समाधान व्यक्त करत आहे.









