हमिंगबर्ड हा पक्षी तसा सर्वांच्या परिचयाचा आहे. अनेकांनी तो प्रत्यक्षात पाहिला नसला तरी त्याच्यासंबंधी वाचलेले किंवा ऐकलेले निश्चितच असते. या पक्ष्याचे भारतात 350 हून अधिक प्रकार आज ज्ञात आहेत. या पक्ष्यासंबंधी अद्यापही संशोधन होत आहे आणि या संशोधानातून त्याच्यासंबंधीच्या अनेक नव्या बाबीही समोर आल्या आहेत. हा पक्षी हे एक निसर्गनिर्मित आश्चर्यच आहे, असे मानले जाते. वाल्मिकी व्याघ्र संरक्षण प्रकल्पात असे अनेक पक्षी आहेत.
मधमाशीसारख्या आकारावा हमिंगबर्ड या अभयारण्यात आढळतो. त्याचे वजन अवघे 2 ग्राम असून तो जगातील सर्वात लहान पक्षी मानला जातो. त्यामुळे त्याला ‘बी’ हमिंगबर्ड असे संबोधले जाते. या पक्ष्याचे सर्वात मोठे आणि एकमेवाद्वितीय वैशिष्ट्या असे की, तो पुढे आणि मागे असा दोन्हीकडे उडू शकतो. ‘रिव्हर्स गिअर’मध्ये उडणारी ही जगातील एकमेव पक्षीप्रजाती आहे, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. या पक्ष्याचे हृदय एका मिनिटाला 1 हजार 260 वेळा धडकते. तर त्याच्या पंखांच्या हालण्याचा वेग तर तोंडात बोटे घालावयास लावील असा आहे. त्याचे पंख एका सेकंदाला 200 वेळा हालतात. याच कारणासाठी या पक्ष्याचे हृदय इतक्या अधिक वेळा धडधडते. कारण पंख इतक्या वेगात फडफडतात की त्यांना तितक्या अधिक प्रमाणात रक्तपुरवठा करण्यासाठी त्यांच्या हृदयालाही तेवढे अधिक काम करावे लागते. जगातील सर्वात मोठ्या हमिंगबर्डचे वजन 20 ग्राम असू शकते. तर लांबी 8 सेंटीमीटर असू शकते. फुलांमधला मध आणि परागकण हा या पक्षाचा आहार आहे. मध मिळविण्यासाठी त्याच्या चोचीचा विकासही त्याप्रमाणे झाला आहे. शरिराच्या मानाने त्याची चोच बरीच लांब असते. हा पक्षी अतिशय लहान किडे आणि अळ्याही खाऊ शकतो. या पक्ष्याची अशी अनेक वैशिष्ट्यो आहेत, की जी संशोधकांनाही आचंबित करतात. त्याचे पंख हालत असताना जी कंपने निर्माण होतात, त्यांच्यातून गाणे गुणगुणल्यासारखा ध्वनि निर्माण होतो. म्हणून या पक्ष्याला हमिंगबर्ड असे संबोधले जाते. भारतात ‘नेचर, एन्व्हायर्नमेंट अँड वाईल्ड लाईफ सोसायटी’ ही संस्था या पक्ष्यावर अधिक संशोधन करीत आहे. या पक्ष्यांचा नैसर्गिक आधिवास माणसांकडून आक्रमित झाल्याने त्याच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तसे होऊ नये म्हणून ही संस्था प्रयत्न करीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडूनही तसे प्रयत्न केले जात आहेत.








