प्रियांका वड्रा यांची मागणी : चेन्नईतील द्रमुकच्या महिला अधिकार संमेलनात सहभाग
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे द्रमुककडून आयोजित महिला अधिकार संमेलनात भाग घेत काँग्रेस महासचिव प्रियांका वड्रा यांनी महिला आरक्षण विधेयक तत्काळ लागू करण्याची मागणी केली आहे. भारतीय महिलांकडे आता वाया घालविण्यासाठी आणखी वेळ नाही असे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी तामिळनाडूतील स्वत:च्या वडिलांच्या हत्येचा उल्लेख करत तो अत्यंत दु:खी करणारा क्षण होता असे उद्गार काढले आहेत.
आम्ही स्त्रिया म्हणजे या सुंदर देशाच्या शक्ती आहोत, या देशाला आम्ही आमची मातृभूमी म्हणतो. देशाच्या महिलांनी कधी न कधी अभावाचा सामना केला आहे. आम्ही आमच्या देशाला विकासाच्या पथावर नेणाऱ्या कार्यशक्ती आहोत. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने आणि मनात इच्छा बाळगून असणाऱ्या लाखो-कोट्यावधी नवयुवती देखील आमची आहोत असे उद्गार वड्रा यांनी काढले आहेत.
राजकीय प्रक्रियेत सामील होणे हा आमचा अधिकार आहे. आमचे ‘स्वत्वा’चे महत्त्व समजून घेत महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक राजकीय शक्तीच्या स्वरुपात आमच्या महत्त्वाचा सन्मान केला जावा अशी मागणी असल्याचे वड्रा यांनी म्हटले आहे.









