चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकातील प्रकार, -अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
चिपळूण
धामापूर येथे जाण्यासाठी एसटी बसगाडीत चढत असताना अज्ञात चोरट्याने पर्समधील 2 लाख 30 हजार किंमतीचे दागिने चोरल्याची घटना सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास येथील मध्यवर्ती बसस्थानकात घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची फिर्याद वर्षा प्रदीप महाडिक (38, चिपळूण) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा महाडिक या 6 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता त्यांच्या गावी मुलीसह धामापूर येथे जात होत्या. यावेळी त्या चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकातील चिपळूण-धामापूर एसटी बसमध्ये चढत असताना त्याच्या खांद्याला लावलेल्या पर्समधील 2 लाख 30 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने असलेला स्टिलचा डबा पर्सची चेन उघडून चोरट्याने चोरुन नेला. हा प्रकार महाडिक यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या बाबतची फिर्याद येथील पेलीस स्थानकात दिल्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.









