हॉटेलमध्ये हिडन कॅमेऱ्याची होती भीती
चीनमध्ये एका महिलेने हॉटेलच्या खोलीत छुप्या कॅमेऱ्यांच्या भीतीमुळे बेडला झाकण्यासाठी तात्पुरता तंबूच उभारला. महिलेचे हे कृत्य आता इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरले आहे. तिने अत्यंत सहजपणे दोरखंड आणि कपड्याच्या मदतीने हॉटेलच्या बेडवर एक तंबू निर्माण केला होता. याचा उद्देश स्वत:ला संभाव्य छुप्या कॅमेऱ्यांपासून वाचविणे होता. हेनान प्रांताच्या लुओयांग येथील रहिवासी डांग नावाच्या महिलेने अलिकडेच व्हिडिओ शेअर केला होता. यात कशाप्रकारे तिने हॉटेलच्या खोलीत बेडच्या सुरक्षेसाठी तात्पुरता तंबू निर्माण केला होता, हे यात दिसून येते.
पाळत ठेवल्याची भीती
या महिलेने हॉटेलचे नाव किंवा स्थान जाहीर केलेले नाही. मी हॉटेल्सच्या ग्राहकांवर हेर कॅमेऱ्यांद्वारे पाळत ठेवण्यात येत असल्याचे वृत्त वाचले आहे. स्वत:ला या कॅमेऱ्यांपासून वाचविणे मला जवळपास अशक्य वाटले, याचमुळे मी अत्यंत चिंतेत होते. यानंतर प्रवासात हॉटेल्समध्ये वास्तव्यादरम्यान बेडवर ठेवण्यासाठी एक तंबू खरेदी करण्याचा विचार माझ्या मनात आला. परंतु तंबूची किंमत आणि हॉटेलच्या खोलीत बेडवर कमी जागा असल्याने मी हा पर्याय फेटाळला. याऐवजी एक मोठी चादर अन् दोरखंडच्या एका तुकड्याद्वारे बेड झाकण्याचे काम केल्याचे डांगने सांगितले.
पूर्ण बेड झाकला
दोरखंडला कुठल्याही उंच ठिकाणी बांधू शकता, कॅबिनेटचे हँडल, पडद्याचा रॉड किंवा भिंतीवरील हुक तेथे दोरखंडावर डस्टक्लॉथ लटकवून त्याला बेडच्या काठावर ठेवा. हा आकार एका तंबूसारखा होईल. कारण कापड अत्यंत हलके असल्याने ही अत्यंत सोपी पद्धत असल्याचे डांग सांगते. तिने व्हिडिओत तंबूचा आकार दाखविला असून जो 1.7 मीटर उंच, 2 मीटर लांब आणि 2 मीटर रुंद होता.
महिलेचे कौतुक
डांगच्या या व्हिडिओवर एका युजरने तिचे कौतुक केले आहे. स्वत:च्या खासगीत्वाच्या सुरक्षेसाठी एक सरल अन् प्रभावी पद्धत तिने दाखवून दिली असल्याचे त्याने म्हटले आहे.
मलेशियातील घटना
हॉटेलमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांच्या खोल्यांध्ये छुपे कॅमेरे आढळून येत असतात. 2023 मध्ये चीनच्या एका जोडप्याला मलेशियात एअरबीएनबीमध्ये वास्तव्यादरम्यान भिंतीवरील पॉवर सॉकेटमध्ये छुपा कॅमेरा आढळून आला होता. याद्वारे थेट बेडचे चित्रिकरण केले जात होते. या दांपत्याने त्वरित स्थानिक अधिकाऱ्यांना कळविले होते. तर दक्षिण चीनच्या गुआंग्डोंग प्रांतात हॉटेलच्या खोल्यांमध्ये कुठलेही देखरेखीचे उपकरण स्थापित न करण्याचा निर्णय आहे.









